शेत शिवारातून दोन क्विंटल कापसाची चोरी

Thieves’ march to white gold : Two quintals of cotton were stolen from Kolvad Shet Shiwar यावल : तालुक्यातील कोळवद येथील शेत शिवारातून कापसाच्या शेतात उभ्या पिकातील कापूस वेचून अज्ञात चोरट्याने लांबवला. दोन क्विंटल वजनाचा व 16 हजार रुपये किंमतीचा कापूस लांबवल्याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

उभ्या शेतातून लांबवला कापूस
कोळवद, ता.यावल या शेत-शिवारामध्ये यशवंत टोपा महाजन यांचे शेत असून शेत गट क्रमांक 152 मध्ये त्यांनी कापूस लागवड केली आहे. वेचणी योग्य झालेल्या कापसाच्या शेतातून अज्ञात चोरट्यांनी तब्बल दोन क्विंटल कापूस लांबवल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी यशवंत महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध कापूस चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजय देवरे करीत आहे.