शेत-शिवारातून पाईप लांबवणारा चोरटा रावेर पोलिसांच्या जाळ्यात

0

रावेर- तालुक्यातील कुसूंबा येथील शेत-शिवारतील पाईप चोरीचा गुन्हा उघड करण्यास रावेर पोलिसांना यश आले आहे. अमीन तडवी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. भावलाल महाजन यांनी त्यांच्या कुसूंबा येथील शेती-शिवारातील शेत गट नंबर 81/2 या शेतात पाईप-लाईन करण्यासाठी पीव्हीसी पाइप आणून निंबाच्या झाडावर ठेवले होते. 13 सप्टेंबरच्या रात्री अज्ञात चोरट्याने त्यांच्या शेतातील 25 पीव्हीसी पाईप चोरुन नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल होता. पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी तपासाचे चक्र फिरवल्यानंतर फौजदार मनोहर जाधव, हवालदार गफुर शेख, कॉन्स्टेबल हरी पाटील, जाकीर पिंजारी, मंदार पाटील, संदीप पाटील, योगेश चौधरी, विकास पहुरकर यांच्या पथकाने आरोपीस अअक केली. आरोपीने चोरलेले पाईप काढून दिले आहेत.