मुंबई: ‘ये है मोहब्बते’ मालिकेतील आदर्श सून ‘इशिता’ची भूमिका साकारणारी दिव्यांका घराघरांत पोहोचली. तिला चाहत्यांचंही भरभरून प्रेम मिळालंय. मात्र आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मालिका जरी संपली तरीदेखील दिव्यांका नव्या मालिकेच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
एकता कपूरच्या आगामी एका वेबसीरिजमध्ये दिव्यांका झळकणार आहे. या आगामी वेबसीरिजचं नाव ‘शेफ’ असं आहे. या वेबसीरिजमध्ये दिव्यांका एका शेफच्या भूमिकेत झळकणार आहे. या सीरिजचं चित्रीकरण सुरु झालं.