शेमळदे येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात

0

उंचदा । येथून जवळच असलेल्या शेमळदे जिल्हा परिषद शाळेत पंचक्रोशीतील संपूर्ण शाळा एकत्र येवून शाळांचा सर्वांगिण विकास साधण्यासंदर्भात केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोेजन करण्यात आले होते. त्याबाबत केंद्रप्रमुख एस.व्ही. ठोसर आणि कार्यक्रमाचे उद्घाटक व्ही.डी. सरोदे यांनी उपस्थित पंचक्रोशीतील शिक्षक, मुख्याध्यापक यांना मार्गदर्शन केले.

याप्रसंंगी शाळेच्या मुख्याध्यापिका दिपाली पाटील, शिक्षक खानझोडे, बारसे, अंगणवाडी मदतनिस प्रमिला भालेराव, अनिता भालेराव, अर्चना जावरे आदी उपस्थित होत्या. तसेच पंचाणे, मुंढोळदे, मेळसांगवे, उचंदे, पुरनाड, खामखेडा येथील शिक्षक, मुख्याध्यापक उपस्थित होते.

आपल्या शाळेचा विकास साधून शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात कसे आणता येईल याविषयी चर्चा करुन मुलांना शिक्षणात आनंद निर्माण व्हावा म्हणून शिक्षकांनी शैक्षणिक साहित्य निर्माण करावे आणि विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी शैक्षणिक साहित्याचा योग्य वापर व्हावा याविषयी व्ही.डी. सरोदे यांनी मार्गदर्शन करुन परिसरातील 30 ते 35 शिक्षकांनी निर्माण केलेल्या शैक्षणिक साहित्य, प्रदर्शनाचा गावातील सर्व मुलांनी, नागरीक, अंणगवाडी सेविका, मदतनिस यांनी लाभ घेतला.