जळगाव : मेहरूण परीसरात बुधवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास भांडण सोडविण्याच्या कारणावरून शेर चौक रिक्षा स्टॉप जवळ दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत दोन्ही गटातील सात जण गंभीर जखमी झाले आहे. यात नगरसेवक इक्बाल पिरजादे यांचा समावेश होता. जखमींना जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीसात परस्परविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय होती घटना, एका तरूणाची 500 रूपयांची नोट घेतल्याच्या कारणावरून गणेश सपकाळे यांच्यावर घेतला. त्यामुळे काही तरूण गणेशला मारहाण करायला सुरूवात केली. यात नगरसेवक इक्बाल पिरजादे यांचा मुलगा शकिल पिरजादे हा भांडण सोडवित असतांना झालेल्या गैरसमजूत दुसर्या गटाला मिळाली. त्यानुसार दुसर्यागटातील युवकांनी लाकडी दांडा व काठ्यांनी नगरसेवक इक्बालोद्दिन जियाउद्दीन पिरजादे यांच्यासह 12 जण जखमी झाले. तर समोरील गटातील दहा जण जखमी झाले.
दोन गटात झाली होती तुंबड हाणामारी
फिर्यादी इकबालोद्दिने जियोउद्दिन पिरजादे (वय-65)रा. पिरजादे वाडा मेहरूण यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, भांडण सोडविण्याच्या कारणावरून लाकडी काठ्या व लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी जाबीर खान शाबीर खान मुलतान, शोएब आमिर खान, सुदाम मुलतानी अकिल मुलतानी, युसुफ मुलतानी, इमराण गोमा मुलतानी यांच्यासह 4 ते 5 जणांविरोधात गुन्हादाखल करण्यात आली. तर दुसर्या गटातील जाबीर खान शाबीर खान मुलतानी (वय-32) रा. मास्टर कॉलनी, अमर मशीन गल्ली, मेहरूण यांनी दिलेल्या फिर्यादीत हॉकी स्टी, बेस बॉल स्टीक लाकडी काठ्या यांनी मारहाण केल्याने जखमी केल्याप्रकरणी इकबालोद्दिन जियाउद्दिन पिरजादे, दार इकबालोद्दिन पिरजादे, शकिल इकबालोद्दिन पिरजादे, सोहेल पिरजादे, फकिरोद्दिने पिरजादे, रिजवानुद्दिन पिरजादे, कपीलोद्दिने पिरजादे, रिजवानुद्दिने पिरजादे, शोएब जमिलोद्दिन पिरजादे, आरीफ इस्लाउद्दिने पिरजादे, अबिदउद्दिने पिरजादे सर्व रा. मेहरूण जळगाव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.