शेळगाव बॅरेजचे काम 2019 पर्यंत पूर्ण करण्याचे जलसंपदा मंत्र्यांचे आदेश

0

कामांची केली पाहणी : प्रलंबित कामांसाठी 400 कोटीं देण्याची गवही

यावल- तालुक्याकरीता महत्वाकांक्षी असलेल्या शेळगाव बॅरेजला जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी भेट देत कामाची पाहणी केली तर जुलै 2019 पर्यंत काम पुर्ण करावे, अशा सुचना प्रसंगी त्यांनी उपस्थित तापी महामंडळाचे संचालक कुळकर्णी यांना दिल्या. या प्रसंगी आमदार हरीभाऊ जावळेंसह स्थानिक लोेकप्रतिनिधींची उपस्थिती होती. गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या शेळगाव बॅरेजच्या कामाला राज्याच्या भाजप सरकारकडून चाना देत 699 कोटींच्या कामाला सुधारीत प्रशासकिय मान्यता देण्यात आली होती मात्र प्रत्यक्षात निधी मिळत नसल्याने काम रखडलेचं होते मात्र शनिवारी या धरणाची क्षेत्रीय पाहणी करण्या करीता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आले. जुलै 2019 पर्यंत काम पूर्ण करावे व आपण स्वतःहा या कामाच्या जलपूजनाकरीता येई, अशी ग्वाही प्रसंगी त्यांनी दिली.

400 कोटी रुपये देण्याचे आश्‍वासन
आजवर या कामाकरीता 300 कोटी रुपये देण्यात आले असून आता 400 कोटी रुपये तत्काळ देवू, असे आश्वासन मंत्री महाजन यांनी दिले. या कामाला आता गती गती मिळेल, अशी अपेक्षा तालुकावासीयांना आहे. यावेळी आमदार हरीभाऊ जावळेंसह भाजप जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, जिल्हा परीषद सदस्या सविता अतुल भालेराव, जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील, पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी, पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, योगेश भंगाळे, अतुल भालेराव, महेंद्र कोळी, योगेश साळुंके, ज्ञानेश्वर तायडे व तापी महामंडळाचे अभियंता यांची उपस्थिती होती.