यावल- शेेळगाव बॅरेजवर जनरेटरच्या हँडलचा मार लागुन एका जणाचा मृत्यू झाल्याची घडना घडली आहे. भिका मधुमंगल यादव (47, मुळ रहिवासी राजापूर, गोपळगंज, कठीया बिहार) असे मयताचे नाव आहे. ही घटना बुधवारी दुपारी घडली. यादव याच्या छातीला जबर मार लागल्या नंतर त्यास जळगाव येथे शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात उपचारा करीता नेेण्यात आले मात्र उपचारापुर्वीचं त्याचा मृत्यू झाला. याबाबत जळगाव रुग्णालयाचे डॉ. तुषार घोंगळे यांच्या खबरीवरून यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक फौजदार अजीज शेख, नागपाल भास्कर करीत आहेत.