जळगाव : जळगाव तालुक्यातील शेळगाव बॅरेज दरवाजा गेट जवळून चोरट्यांनी 10 हजार रुपये किंमतीचे लोखंडी साहित्य लांबवले. या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्यांचा पोलिसांकडून शोध
जळगाव तालुक्यातील नशिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शेळगाव बॅरेज दरवाजाजवळ गेटचे काम सुरू असून यासाठी लोखंडी साहित्य व लोखंडी प्लेटाचे स्क्रॅप ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी वेल्डिंगचे काम असल्याने सर्व साहित्य एका ठिकाणी ठेवण्यात आले होते. मंगळवार, 22 फेब्रुवारी आठ आठ वाजेच्या सुमारास या ठिकाणी ठेवलेले लोखंडी साहित्य व लोखंडी प्लेटा चोरट्यांनी चोरून नेल्या. याबाबत सुरेश छावा सुभाराव (35, रा.गुंटुर, आंध्रप्रदेश) नशिराबाद पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक फौजदार अलियार खान करीत आहे.