माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरींसह शेतकर्यांचे निवेदन
भुसावळ- तब्बल 20 वर्षांपासून रखडलेल्या शेळगाव मध्यम प्रकल्पासाठी शासनाने निधी द्यावा, अशी मागणी भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्यासह शेतकर्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. याप्रसंगी महाजन यांनी मागण्यांबाबत दखल घेण्याचे आश्वासन दिले.
शेतीसह पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार
यावलसह रावेर तालुक्यातील शेतकर्यांना दिलासा देणारा हा प्रकल्प असून हा प्रकल्प पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. तब्बल 25 हजार एकर शेती या प्रकल्पामुळे सिंचनाखाली येणार आहे. जिल्ह्यातील प्रलंबित प्रकल्प मार्गी लावण्यात आल्याने मंत्री महाजन यांनी या प्रकल्पाबाबतही दखल घ्यावी, अशी विनंती करण्यात आली. यावलसह रावेर तालुक्यातील शेतीला या प्रकल्पाचा फायदा होईल शिवाय भुसावळ शहराचा पाणीप्रश्नदेखील यामुळे मिटणार आहे.
निवेदनावर यांच्या स्वाक्षर्या
निवेदनावर अनिल छबीलदास चौधरी यांच्यासह गोपाळ सपकाळे, भगवान सपकाळे, काशीनाथ पाटील, योगेंद्रसिंग पाटील, अशोक पाटील, संदीप महाजन, भिकन सपकाळे, आनंदा धांडे, अभिजीत मराठे, संकेत पाटील, किरण सिसोदीया यांच्यासह अन्य शेतकर्यांच्या स्वाक्षर्या आहेत.