शेवटच्या वन-डेसाठी ३ कोटींच्या टिकीटांची विक्री !

0

थिरूवनंतपुरम- भारत आणि वेस्ट इंडीज संघादरम्यान पाच एकदिवसीय सामने खेळले जात आहे. चार सामने संपले असून दोन सामन्यात भारताने तर एक सामना वेस्ट इंडीज संघाने जिंकले आहे. तर एक सामना बरोबरीत सुटला त्यामुळे शेवटचा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा असणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी ३ कोटींचे टिकीटे विकली गेली आहे.

शेवटचा सामना पाहण्यासाठी चाहते उत्सुक अआहे. भारत हा सामना जिंकून मालिका ताब्यात घेण्यासाठी लढणार आहे तर वेस्ट इंडीज संघ सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडण्यासाठी प्रयत्न करणार आहे.