शेवटी विराटने कुंबळेच्या आरोपावर मौन सोडले !

0

पोर्ट ऑफ स्पेन । कुंबळे यांनी राजीनामा दिल्यानंतर अनेक दिग्गंज क्रिकेटपटूनी आपली नाराजी व्यक्त केली.मात्र कोहली यावर काहीच बोलत नव्हता.आज वेस्टइंडिज दौर्‍यावर गेला असतांना त्याने कोहली -कुबंळे वादाबद्दल मौन सोडले आहे.ड्रेसिंग रूम मधील गोष्टी कधीच जाहिर करणार नाही असे म्हणत गुगली टाकली.याचबरोबर अनिल कुंबळे याच्या पत्राचा उल्लेख करत त्याने सांगितले की आमच्यातील संबंध अस्थिर झाले होते. या सर्व वादावर कोहली याने यार्कर, गुगली टाकत सर्व प्रश्‍नांना बगल दिली.

वेस्ट इंडिज विरुद्ध आजपासून सुरु होणार्‍या मालिकेआधी विराटने या वादावर पहिल्यांदा खुलेपणाने भाष्य करत त्याची बाजू मांडली. कुंबळे यांनी राजीनाम दिला.यावर कोहली म्हणाल की, राजीनामा देण्याच्या कुंबळेच्या निर्णयाचा मी सन्मान करतो. शिवाय एक खेळाडू म्हणून माझ्या मनात त्यांच्याविषयी आदर आहे. अनिल भाईंनी त्यांचे विचार मांडले आणि पदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला. मी त्यांच्या या निर्णयाचा सन्मान करतो. स्पर्धेनंतर ही गोष्ट घडली आहे.माझ्यासाठी ड्रेसिंग रुममधील गोष्टी फारच महत्त्वाच्या आहे, ज्या मी कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक करु शकत नाही. पण एक बाब निश्चित आहे, मी चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान 11 पत्रकार परिषद घेतल्या. आम्ही मागील तीन-चार वर्षांत असा पायंडा घातला आहे की, ड्रेसिंग रुममध्ये घडलेल्या गोष्टी कधीही जाहीर केल्या नाहीत. त्याचे पावित्र कायम राखले आहे.संपूर्ण संघाचा यावर विश्वास आहे. ते आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे, असे विराट कोहलीने स्पष्ट केले.मी आणि संघातील खेळाडूंनी अनिल कुंबळेंचा कायमच आदर केला. एक क्रिकेटर म्हणून देशासाठी खेळताना त्यांनी जे योगदान दिले, त्याचा मला आदर आहे. त्यांच्याकडून सन्मान, आदर हिसकावून घेऊ शकत नाही. आम्हा सगळ्यांनाच त्यांचा अभिमान आहे, असे कोहलीने सांगितले.