शेवाड येथील गावकर्‍यांनी ठोकले जिल्हा परिषद शाळेला कुलूप

0

शिंदखेडा। शेवाडे तालुका शिंदखेडा येथील गावकर्‍यांनी गुरूवार 22 रोजी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक कमी असल्याच्या कारणाने कुलूप ठोकले आहे. शेवाडे येथील जिल्हा परिषद शाळेचे 1 ते 4 पर्यंत वर्ग असून त्यांची एकूण विध्यार्थी संख्या 220 आहे. या चार वर्गांसाठी केवळ शिक्षक 2 शिक्षक आहेत. या दोघां शिक्षकांना देखील शासकीय कामात अडकविले जाते. याबाबत गावकर्‍यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना वेळोवेळी निवेदन देऊन शेवाडे जि.प. शाळेची 220 विद्यार्थीसाठी शिक्षक संख्या किमान 4 करण्यात यावी असे निवेदन येथील गावकर्‍यांनी दिली होते.

अखेर एक शिक्षक मिळाला
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सांगण्यात आले होते की एक वर्षांपासुन गावातील मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तरी आपण लवकरात लवकर शिक्षक नेमावेत अन्यथा शाळेला कुलूप लावून बंद करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता. गेल्या 1 वषार्ंपासून सतत पाठपुरावा करून देखील अधिकारी झोपेचे सोंग घेतल्याने 22 रोजी शिवसेना विभाग प्रमुख बबलु कोळी, शालेय शिक्षण समिती उपाध्यक्ष दिपक माळी, संदिप देशमुख, भुरा गिरासे, कन्हैया कोळी, सागर देशमुख, राज दावळे ,राकेश कोळी, सागर निकुम व ग्रामस्थांनी एकत्र येत शाळेला कुलूप लावले. शाळेला कुलुप लावल्याने सर्व विध्यार्थी हे शाळेचा प्रांगणात तात्काळत बसले होते. सदरची घटना गटशिक्षणाधिकारी कळल्यावर एक उपशिक्षक देण्यात आला आहे.