A 20-year-old married woman committed suicide by hanging herself: incident in Shewale village पाचोरा : रक्षाबंधनानिमित्त माहेरी आलेल्या 20 वर्षीय विवाहितेने राहत्या घरातील स्वयंपाकघरात गळफास घेतला. पाचोरा तालुक्यातील शेवाळे येथे शनिवार, 13 ऑगस्ट रोजी ही घटना घडली. या प्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उमा सनी उमप (20) असे मयत विवाहितेचे नाव आहे. पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येचे स्पष्ट कारण कळू शकले नाही.
माहेरी आल्यानंतर उचलले टोकाचे पाऊल
शेवाळे, ता.पाचोरा येथील नानू शिवदास फादगे यांची एकूलती एक कन्या उमा नानू फादगे (20) हिचा विवाह जळगावच्या खंडेराव नगरातील सनी प्रेमनाथ उमप यांच्याशी शेवाळे येथे 18 मे 2022 रोजी मोठ्या थाटात पार पडला. त्यानंतर रक्षाबंधन सणासाठी आपल्या दोन भावंडांना राखी बांधण्यासाठी शुक्रवार, 12 ऑगस्ट 2022 रोजी उमा हिचे वडिल नानू फादगे हे उमाला माहेरी घेऊन आले होते. शनिवार, 13 ऑगस्ट रोजी उमा ही अंघोळी जायचे म्हणून घरातील स्नानगृहाकडे गेली मात्र बराच वेळ होवुन सुद्धा उमा येत नसल्याने वडिल नानू फादगे यांनी घरात शोध घेतला असता घरातील स्वयंपाक घरात उमा ही दोरीच्या सहाय्याने फाशी घेतल्याचे दिसून आले. हे दृश्य पाहून वडिल नानू फादगे यांनी एकच हंबरडा फोडला.
पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
ग्रामस्थांच्या मदतीने उमा हिस पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित साळुंखे यांनी मृत घोषित केले. उमा सनी उमप या विवाहितेने आत्महत्या का केली ? यांचे कारण मात्र अद्याप समजु शकले नाही. डॉ.अमित साळुंखे यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल राकेश खोंडे करीत आहेत.