शॉक बसून शेतकर्‍याचा मृत्यू

0

वाघोली । मांजरी खुर्द येथील शेतकरी तुकाराम नारायण मोरे (वय ५१) सोमवारी दुपारी बारा-एक वाजता शेतावर गेले असता, शेतातील विहिरीवर असणार्‍या विजेच्या खांबाला ताण दिलेल्या तारेला वीजपुरवठा आल्याने त्या विजेच्या तारेचा शॉक बसून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

तुकाराम मोरे व पत्नी नंदाबाई मोरे हे दोघेही स्वतःच्या शेतात औषध फवारणी, पंपात पाणी भरण्यासाठी गेले असताना वीजवितरणाच्या पोलला दिलेल्या अर्थिंगला व ताणाला शॉक बसल्याने तुकाराम जागीच मृत्युमुखी पडले. त्यांच्या पत्नीने आरडाओरडा करून परिसरातील शेतकर्‍यांना बोलावले. नातेवाइकांनी वीजवितरणच्या कंपनी विरोधात लोणीकंद पोलिसात तक्रार दाखल केली. याची दखल घेऊन पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी साहाय्यक फौजदार साळुंके यांना घटनास्थळी पाठवले.

अधिकार्‍याची प्रतिक्रिया देण्यास नकार
अंदाजे पंचवीस वर्षांपूर्वी मांजरी येथील शेतकर्‍याचा विहिरीवरील मोटारीला शॉक लागून अपघात झाला होता. आताही वीजवितरण कंपनीचा एकही अधिकारी सायंकाळी चार वाजेपर्यंत घटनास्थळी हजर झाला नाही. वीजवितरण कंपनीचा निष्काळजीपणा शेतकर्‍याच्या जिवावर बेतला. याविषयी वीजवितरण कंपनीच्या अधिकार्‍याने प्रतिक्रिया देण्यास टाळले.