शॉक लागून तरूणाचा मृत्यू

0

जळगाव। मित्राच्या पत्र्याच्या घरावर ताडपत्री टाकत असतांना तरूणाचा सर्व्हीस वायरला स्पर्श झाल्याने त्याला जोरदार ईलेक्ट्रीक शॉक लागून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास हरिविठ्ठलनगरात घडली.

विनोद सोमा रुले (वय-30) हा हरिविठ्ठलनगरात पत्नी, आई वडील यांच्यासोबत राहत होता तर फर्निचरचे कामे करून आपल्या घराचा उदरनिर्वाह करायचा. गुरूवारी सायंकाळी विनोद हा मित्र योगेश अशोक मिस्तरी याच्या घरी गेला होता. दरम्यान, योगेश याचे घर पत्र्याचे असल्यामुळे पावसाचे पाणी घरात शिरते म्हणून योगेश आणि विनोद हे पत्र्याच्या घरावर चढून ताडपत्री टाकत होते. सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास विनोद याचा अचानक ताडपत्री टाकत असतांना अचानक सर्व्हीस वायरला स्पर्श झाला आणि त्याला जोरदार इलेक्ट्रीक शॉक लागला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. योगेश याने लागलीच विनोदला जिल्हा सामान्य रूग्णालयात नेले परंतू प्राथमिक तपासणी नंतर वैद्यकीय अधिकार्‍यांनी विनोदला मृत घोषित केले. मुलाच्या मृत्या झाल्याचे कळताच कुटूंबियांनी रूग्णालयात एकच आक्रोश केला. यावेळी नातेवाईकांनी गर्दी केली होती.