जळगाव प्रतिनिधी । अनियमीत वीजेच्या दाबामुळे घरातील टीव्हीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने टीव्ही व फर्निचर, गाद्या जळून खाक झाल्याची घटना सिंधी कॉलनीत घडली.
सिंधी कॉलनीतल्या सेवा मंडळासमोरील लक्ष्मी अपार्टमेंटमध्ये ओमप्रकाश कौराणी यांच्या घरात कमी-जास्त दाबाच्या विजेमुळे शॉर्टसर्कीट होऊन आग लागली. यात टिव्हीचा स्फोट होऊन फर्नीचरने पेट घेतला. परिसरातील नागरिकांनी पाणी टाकुन आग विझवली. दरम्यान, विजेच्या अनियमीत दाबामुळे हे घडले असल्यामुळे संबंधीत खात्याने नियमित दाबाचा विज पुरवठा करण्याची मागणी होत आहे.