शॉर्ट सर्कीटमुळे कृषीकेंद्रास आग

0

अमळनेर । शहरातील जुने बस स्टॅण्ड भागातील कृषी केंद्राच्या दुकानाला लागलेल्या आगीत सुमारे 7 ते 8 लाखाचा माल जळून खाक झाला आहे. परीसरातील नागरिकांनी प्रसंगावधान राखत त्वरीत आग विझवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. जुने बस स्टॅण्ड परिसरातील राजीव गांधी मार्केट मधील दु.न. 21/12 दिनेश ट्रेडर्स हे कीटकनाशक, खते, बी बियाण्याचे दुकान सुभाष पाटील यांच्या मालकीचे दुकानाला गुरूवार 3 ऑगस्ट रोजी सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास अचानक धूर निघत असल्याचे नागरिकांना दिसून आले. त्यांनी घटनेची माहिती मालकाला दिल्यावर त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होवून अग्निशमन दलाला बोलवून आग विझवल्यामुळे मोठा अपघात टळला आहे.

सदर घटनेची माहिती अमळनेर पोलिसांना देऊन पो.हे.कॉ सुभाष साळुंखे यांनी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. दुकानात कीटक नाशक, वाँटर सोन्यूबल, खते, फर्निचर, पंखे, इन्व्हर्टर असा एकूण 7 ते 8 लाखाचा माल जळून खाक झाला असून आगीचे कारण समजू शकले नाही.