भुसावळ । भगवान महावीर यांच्या जयंंती उत्सवानिमित्त शहरातील ओसवाल पंचायत भवनात धार्मिक कार्यक्रम पार पडले. यानंतर सायंकाळी शहरातील प्रमुख मार्गाने शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये महिला भाविकांनी डोक्यावर कलश धारण केले होेते. तसेच भगवान महावीरांचा जयघोष या शोभायात्रेदरम्यान करण्यात आला. यामध्ये साकारण्यात आलेल्या सजीव देखाव्याने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले. आठवडे बाजारातील जैन मंदिरात पुजाअर्चा व अभिषेक होवून गांधी चौकातून ही शोभायात्रा
काढण्यात आली.
पुस्तक प्रकाशन सोहळ्यात यांची होती उपस्थिती
प्रेमचंद कोटेचा यांच्या हस्ते काव्यगीते, स्तवन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष कचरुलाल कोटेचा, नगरसेवक निर्मल कोठारी, कांतीलाल चोरडिया, सुभाषचंद्र बजाज, रमेश अन्नदाते, प्रेमचंद चोपडा, पारस कोठारी, सतिश साखरे, लता सिसोदिया, अनिता सांखला, विजय भराडिया, जे.बी. कोटेचा, विनोद शर्मा, अनुप अग्रवाल, भारती राठी उपस्थित होते.