शोभायात्रेतुन रामनामाच्या गजराने दुमदुमली नंदनगरी

0

नंदुरबार । येथील समस्त जय सियाराम परीवारातर्फे मंगळवारी रामनामाचा गजर करीत संत महतांच्या सानिध्यात निघालेल्या भव्य शोभायात्रेने नंदनगरी दुमदुमली. प.पु.संतश्री तारादास बापु यांच्या नेतृत्वाखाली पुरुषोत्तम मासनिमित्त सकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. मोठा मारुती मंदिरापासुन मिरवणुकीस प्रारंभ झाला.ढोल ताशांसह,बॅण्ड पथक, टाळ मृदुंग,लेझिमनृत्य, आदिवासी बांधवांचे शिबली नृत्य लक्षवेधी ठरले.

धार्मिक देखावे ठरले लक्षवेधी
सोनीविहिरपासुन दादा गणपती,शिवाजी रोड,जळका बाजार,टिळक रोड,सोनार खुंट,गणपती मंदिर,हाट दरवाजा,नेहरु चौक,नगर पालीका चौक,दिनदयाल चौक, स्टेट बॅक,छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरमार्गे मोठा मारुती मंदिरात समारोप झाला. कलशधारी बालिका ,युवती,सुवासिनी महिला,फेटेधारक तरुण,जेष्ठ नागरीक,पुरुष भक्तिगितांच्या चालिवर नाचत होते.कार्लि (ता.नंदुरबार) येथील भजनी मंडळातर्फे टाळ मृदृंगाने भाविक तल्लिन झाले. भगवे ध्वज ,तोरण, फुलमाळांनी सजविलेल्या बग्गीत संतश्री तारादासबापु आणि ट्रॅक्टरमध्ये विराजमान संत महात्मे,धार्मिक देखावा लक्षवेधी ठरला.

महिनाभर होती अखंड रामधून
शोभायात्रे दरम्यान शहरात ठिकठिकाणी धर्मप्रेमी भाविकांनी स्वागत करुन पुष्पवृष्टि केली.मिरवणुक मार्गावर शहर वाहतुक शाखेचे महिला पुरुष कर्मचार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.दि.16 मे पासुन सुरु असलेल्या अधिक मासचा आज बुधवार दि.13 जुन रोजी समारोप होत आहे.सलग एक महिण्यापासुन अखंड रामधुन सुरु आहे.दररोज हजारो आणि महिण्याभरात दोन लाखापेक्षा अधिक भाविकांनी सुग्रास भोजनाचा लाभ घेतला. समारोपानिमित्त आज बुधवार दि.13 जुन रोजी सकाळी 11ते 3 वाजेपर्यंत श्रॉफ हायस्कुल मैदानावरिल सभा मंडपात महाप्रसाद (भंडारा) वाटप होईल. भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन प.पु.संतश्री तारादासबापु आणि समस्त जय सियाराम भक्त परीवार ,नंदुरबार यांनी केले आहे.