पनवेल । रोटरी क्लब ऑफ पनवेलच्या रोटरी फाँऊडेशनच्या वतीने मागील अनेक वर्षांपासून अखंडीतपणे पनवेल फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते. यंदा 22 ते 31 डिसेंबर दरम्यान हा महोत्सव रंगणार आहे. विशेष म्हणजे यंदा पहिल्यांदाच या महोत्सवाची सुरूवात पारंपारिक शोभायात्रेने करण्यात येणार आहे. दोनशे पेक्षा अधिक स्टॉल्स, लहान मुलांसाठी मनोरंजक खेळणी, खाद्यपदार्थ्यांचे स्टॉल्स आदीसह स्थानिक कलाकारांच्या गुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
गर्जेतो मराठी हा कार्यक्रम महोत्सवाचे आकर्षण
फेस्टिव्हला दोन लाखांपेक्षा अधिक नागरिक महोत्सवाला भेट देतील असा विश्वास महोत्सवाचे प्रकल्प प्रमुख संतोष आंबवणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला. विशेष म्हणजे यंदा पहिल्यांदाच या महोत्सवाची सुरूवात पारंपारिक शोभायात्रेने करण्यात येणार आहे. स्पेशल इफेक्ट सहित डिजिटल थ्रिडी शो, त्याच बरोबर होणार्या नृत्य स्पर्धेचे परिक्षण नृत्यदिग्दर्शक उमेश जाधव आणि सुभाष नकाशे करणार आहेत. तसेच ग्लँमरस देणारा हँगओव्हर फँशनशो या महोत्सवात होणार आहे. मराठी संस्कृतीची ओळख सांगणार गर्जेतो मराठी हा कार्यक्रमही महोत्सवाचे खास आकर्षण ठरेल असे मत रोटरियन आयोजिकांनी व्यक्त केले आहे. महोत्सवात जमा होणारा निधी रोटरी क्लब वर्षंभर विविध सामाजिक उपक्रमासाठी खर्च करतो.