शौचालयासाठी मक्तेदाराची लवकरच नेमणूक!

0

जळगाव । शहरातील सार्वजनिक शौचलयांची देखभालीच्या मक्तेदाराने काम करण्यास नकार दिल्याने नवीन मक्ता लवकरच देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी उदय पाटील यांनी दिली. शहरातील सार्वजनिक शौचालयांच्या देखभालीचे काम नाशिक येथील नवल वेलफेअर फाऊंडेशनला 10 वर्षांच्या कराराने देण्यात आले होते. या करारानुसार महापालिका मक्तेदाराल पाणी, जंतु नाशके, लाईटची व्यवस्था करून देणार होती. परंतु, महापालिकेडे वारंवार पाठपुरावा करून देखील मक्तेदाराला सुविधा पुरविण्यात आलेली नाही.

महापालिकेच्या आचक अटीशर्ती व 20 महिन्यांचे बील महापालिकेने अदा न केल्याने मक्तेदाराने काम करण्यास असमर्थता दाखविली आहे. यातून मक्तेदाराने महापलिकेला मक्ता संपुष्टात आणावा अशी लेखी विनंती केलेली आहे. यात जाचक अट म्हणजे मक्तेदाराला शहरातील सर्व सार्वजनिक शौचालयाचे देखभाल करावयाची आहे. दरम्यान, महासभेत ‘पे अ‍ॅण्ड युज‘ धर्तींवर शहरातील सार्वजनिक शौचालयाचा मक्ता देण्याचा ठराव पास करण्यात आला होता. परंतु, चार वेळा निविदा प्रसिध्द करूनही प्रतिसाद मिळालेला नाही. तसेच नवीन देखभाल दुरूस्ती मक्तेदाराने पाणी व जंतुनाशकांचा खर्च स्वतः करावे अशी निविदा प्रसिध्द करण्यात येणार आहे. शहरात सार्वजनिक शौचालयाचे 117 ब्लॉक असून 2166 सीटस् आहेत. यात 55 ब्लॉक म्हणजे 1119 सिटस् ह्या पुरूषांसाठी असून उर्वरीत 62 ब्लॉक म्हणजे 1047 सीटस् हे महिलांसाठी आहेत. दरम्यान, बचत गटांना देखभाल दुरूस्तीसाठी आवाहन महापालिकेकडून करण्यात येत आहे. नवीन मक्तांमध्ये चारही प्रभाग समितींची स्वंतत्रपणे तसेच सीटस्प्रमाणे मक्ता घेता येणार आहे.