जळगाव । स्वच्छ भारत मिशन हा शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रमापैकी एक आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्ग शौचालय घरोघरी शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट शासनाने ठेवले आहे. त्यासाठी अनुदानपण देण्यात येत आहे. वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी शासनातर्फे 12 हजाराचे अनुदान मिळते.
मात्र शासनाने नुकतीच कर्जमाफी जाहीर केल्याने प्रत्येक योजनेच्या रकमेतुन 30 टक्के रक्कम कपात करण्याचा निर्णय घेतला असल्याने शौचालयाच्या अनुदानातुन 3600 रुपये रक्कम कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे आता केवळ 8 हजाराचे अनुदान मिळणार आहे. तसेच ज्या गावात 50-60 वैयक्तिक शौचालय बांधकाम बाकी असेल अशा गावातील बांधकाम 20 जुलैपर्यत पुर्ण करण्याचे आदेश पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्यकार्यकारी दिले.