शौर्य दिनानिमित्त माजी सैनिकांचा सन्मान

0
तळेगाव दाभाडे : शौर्य दिनानिमित्त तळेगाव दाभाडे मोहननगर येथे राहत असलेले माजी सैनिक कॅप्टन रघुनाथ कदम, कॅप्टन आदेश जगदाळे, कॅप्टन ज्ञानेश्‍वर वांगेकर यांचा तळेगाव शहर भारतीय जनता पार्टीच्यावतीने सन्मान करून अभिवादन केले. तसेच यावेळी पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईकद्वारे दहशतवाद्यांचे कॅम्प उद्धवस्त करुन 70 दहशतवाद्यांना यमसदनी धाडणार्‍या शूरवीर जवानांना शतशः वंदन करण्यात आले.
यावेळी कार्याध्यक्ष रविंद्र अण्णा आवारे, महिला मोर्चा अध्यक्ष नगरसेविका शोभा भेगडे, महिला मोर्चा कार्याध्यक्ष चारुशीला काटे, युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे, संघटक सुनिलभाऊ कांबळे, ज्येष्ठ कार्यकर्ते महेंद्रजी धारणे हे उपस्थित होते. भाजपचे वरिष्ठ उपाध्यक्ष भास्करराव भेगडे यांनी सैनिकांच्या कार्याचा गौरव करुन आपल्या मनोगतामध्ये आभार मानले. सरचिटणीस निलेश मेहता यांनी चर्चा करताना जठजझ चा विषय काढला असता माजी सैनिकांनी याबद्दल पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सरकारचे कौतुक केले. उपाध्यक्ष प्रमोद देशक यांनी माजी सैनिकांचा परिचय करुन दिला.