श्रद्धा डोडळ असावी, अंध नसावी : काटेबाबा महाराज

0

सदगुरु दर्शनचा प्रकाशन सोहळा उत्साहात

नवी सांगवी : संताचे विचार, जेष्ठांचा आदर ही काळाची गरज आहे. माणसाची डोळस श्रध्दा असावी, पण अंधश्रध्दा नसावी. माणसाला मृत्यू येणार ही वस्तूस्थिती आहे पण तो येऊ नये ही माणसांची मनःस्थिती असते, असे मत स्वस्वरुप शोधक साधक संस्थेचे अध्यक्ष राघवचैतन्य काटेबाबा महाराज यांनी पिंपळे गुरव येथे व्यक्त केले. पिंपळे गुरव येथील खाडेबाबा मठामध्ये लेखक जयदीप काळे यांच्या सदगुरु दर्शन भाग 1 या स्मरणिकेच्या प्रकाशन सोहळ्या प्रसंगी काटेबाबा महाराज बोलत होते.

यावेळी आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समिती महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष पोपट पवार, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा महाराष्ट्र राज्याचे संचालक शेखर गायकवाड, दी महानगर बँकेचे चेअरमन उदय शेळके, राज्य नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग महाराष्ट्र राज्याचे महानिरीक्षक अनिल कवडे, वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, वाहतुक नियंत्रण विभागाचे सहाय्यक पोलिस उपायुक्त राजेंद्र भामरे, भिवडीचे शिवशंभू व्याख्याते ह.भ.प. राजेंद्र महाराज येप्रे, प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसेवक रोहित काटे, माजी स्थायी समिती अध्यक्ष राजेंद्र राजापुरे, गणेश बँकेचे संचालक रावसाहेब चौगुले आदी उपस्थित होते.

सदाचरणाचे साधक बना
प.पू श्री सदगुरु श्रीहरी खाडेबाबा महाराज यांनी स्मरणिकेत संदेश देताना बिघडवणार्‍या साधनापेक्षा घडवणार्‍या साधनांना महत्व दिले पाहिजे. वाईट गोष्टींचे प्रमाण वाढत असून प्रमाणात घट होत नाही. यासाठी सदभावना, सदाचरण व सहकार्याचे प्रचारक, साधक बना. संस्थेच्यावतीने वर्षभर विधायक सामाजिक उपक्रम राबविले जातात. यावेळी साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुकुंद पांचाळ यांनी सुत्रसंचलन केले. प्रवीण वाघमारे यांनी आभार मानले.