जळगाव । येथील श्रमजीवी कामगार ऑटो रिक्षा फेडरेशनची सभा रविवारी शामाप्रसाद मुखर्जी उद्यानात पार पडली़ यात रिक्षाचालकांकडून घेण्यात येणारे विविध कर, विमा, शासकीय फी, परमिट परवाना, आदी बाबींबाबत चर्चा करण्यात आली़ ईस्माईल शाह, सचिन शिंपी, उदय समेळ, प्रमोळ सुरळकर, विलास माळी, नितीन सैंदाणे, जितेंद्र शिंपी, संजय बाविस्कर, चंद्रकांत भावसार, शांताराम अहिरे यांनी विविध समस्या मांडल्या़ अॅड.गोविंद तिवारी यांनी मनोगत व्यक्त केले.