श्रमदानातून नदी पुनरुज्जीवनाला बळकटी

0

चाळीसगांव । राज्यभरात नदी पुनर्जीवन अभियान राबविण्यात येत आहे. नदी पुर्नजीवनासाठी विविध उपक्रम शासनाने हाती घेतले आहे. लोकसहभागातुन व श्रमदानातुन देखील या अभियानास साथ मिळत आहे. चाळीसगाव तालुक्यातील तितुर व डोंगरी नदीच्या उगमस्थानाच्या पायथ्याशी मोरदरा तलावाला मोठी गळती लागली होती. तालुक्यातील जनतेने यासाठी एकत्र येत ‘एक दिवस दुष्काळ मुक्तीसाठी’ शिबिर आयोजित करण्यात आली होती. श्रमदान शिबीराच्या माध्यमातून तलावाची गळती थांबविण्याचे काम केले आहे. आमदार उन्मेष पाटील यांच्या सह शेकडो ग्रामस्थांनी श्रमदान केले. या अभियानामुळे तलावातील सिंचनात वाढ होणार असून या सिंचनाच्या लाभक्षेत्रअंतर्गत येणार्‍या गणेशपूर शिंदी जूनपाणी घोडगाव, करजगाव आदी गावांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.

14 कोटीचा आराखडा
तालुका व शहरातून डोंगरी व तितूर या नदीच्या अस्तित्वाचा व पुनर्जीवनचा प्रश्न निर्माण झाला आहे. या नद्यांच्या पुनर्जीवनाचा सुमारे 14 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला असून हे पथदर्शी अभियान पूर्ण करण्याचा आमदार उन्मेश पाटील यांनी संकल्प केला आहे. मागील आठवड्यात आमदार पाटील यांनी तितुर व डोंगरी नदीच्या 2 उगमस्थानाची प्रत्यक्ष पाहणी केली होती. पाहणी दौरावेळी पायथ्याशी असलेल्या तलावातून मोठी गळती होत असल्याची तक्रार होती.

पाण्याची समस्या मिटणार
मोरदरा धरणावर नैसर्गिक पाण्याचे श्रोत असल्याने हे धरण दरवर्षी शंभर टक्के भरते. मात्र या धरणात 3 ते 4 ठिकाणी गळती असल्याने तलाव वर्षरात रिकामा होत असे. श्रमदानातुन गळती थांबविण्याचे काम केले जात असल्याने भविष्यात पाण्याचा साठा वाढणार आहे. परिसरातील शेतींना सिंचनाचे व पिण्याच्या पाण्याचे प्रश्‍न मिटणार आहे. 3 दिवस श्रमदाना केले जाणार आहे.

यांनी केले श्रमदान
सकाळी 10 वाजेपासून श्रमदानाला सुरुवात करण्यात आले. सदस्य दिनेश बोरसे, संजय पाटील, भाऊसाहेब पाटील, अरुण आहिरे, नरेंद्र जैन, शेषराव चव्हाण, अमोल चव्हाण, मनोज पाटील, बाळासाहेब राऊत, गोरख राठोड, डिगंबर कुमावत, दिनकर राठोड, विकास चौधरी, डॉ.प्रशांत एरंडे, दिपक एरंडे, दिलीप राठोड,अनिल जाधव, ज्ञानेश्वर कवडे, संजय ब्राह्मणकार यांच्या सह वनविभागाच्या अधिकार्‍यांचा व कर्मचार्‍यांनी श्रमदान शिबीरात सहभाग घेतला.