शिक्रापूर । शालेय विद्यार्थ्यांनी श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून केलेल्या कामांचा आढावा घेऊन शिकलेल्या सर्व गोष्टी जतन करत श्रमसंस्कार शिबिराचे अवलोकन करणे गरजेचे असल्याचे मत शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक महेश ढमढेरे यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे व साहेबराव शंकरराव ढमढेरे माध्यमिक विद्यालय यांच्या वतीने धानोरे येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष हिवाळी शिबीराच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. अर्चना भोसुरे, उज्वला गायकवाड, रोहिणी भोसुरे, बापूसाहेब शेळके, हरीष येवले, विवेक जगताप, कांतीलाल भोसुरे, संदीप कामठे, डॉ. प्रदीप पाटील, पराग चौधरी, याकुब मोमीन, रमेश भुजबळ आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
गुरुजनांचा आदर करा
आई-वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मुलांनी प्रयत्न केले पाहिजेत. आई-वडील व गुरुजनांचा आदर करणेही गरजेचे असल्याचे महेश ढमढेरे यांनी सांगितले. या सात दिवसाच्या शिबीरा दरम्यान सर्जेराव शिंदे व सचिन शेलार, कार्यक्रम अधिकारी डॉ. दत्तात्रय वाबळे, डॉ. पद्माकर गोरे, प्रा. उमेय काळे, प्रा. निलेश पाचुंदकर यांनी विशेष परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय कारंडे यांनी केले. डॉ. वाबळे यांनी प्रास्ताविकात विद्यार्थ्यांनी सात दिवसात केलेल्या कामांचा आढावा दिला. तर, डॉ. पद्माकर गोरे यांनी आभार मानले.