श्रीकृष्ण हौसिंग सोसायटीतुन मंदिराचा कळस चोरीस

0

चाळीसगाव । करगाव रोडवरील प्रभाग क्र.1 मधील श्रीकृष्ण हौसिंग सोसायटीतील मारुती मंदिराचा कळस 25 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास चोरी गेल्याचे सकाळी 7 वाजेच्या सुमारास रहीवाश्याच्या लक्षात आल्याने भाविकांमध्ये खळबळ उडाली आहे. मारुती मंदीराची प्राणप्रतिष्ठा 9 एप्रिल 2017 रोजी श्रीकृष्ण हौसिंग सोसायटीतील रहीवाशीनी मोठ्या थाटात केली, मात्र अवघ्या दोन आठवड्यात मंदीराचा कळस अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना 26 एप्रिल 2017 रोजी मंदीराला पाणी मारण्यास गेलेले पांडुरंग महाजन यांच्या लक्षात आल्यानंतर नागरीकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दरम्यान शहर पोलिसात निवेदन देण्यात आले आहे.