श्रीक्षेत्र सुनेसावखेडा येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी

0

फैजपूर। यावल तालुक्यातील श्रीक्षेत्र सुनेसावखेडा येथे हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. यात लघुरुद्र अभिषेक, सहयाग, सामुहिक हनुमान आरतीसह महाप्रसादाचे आयोेजन यावेळी करण्यात आले. यावेळी महामंडलेश्‍वर स्वामी जनार्दन हरिजी महाराज, शास्त्री भक्ति किशोरदास, महंत जगद्प्रकाशदास, शास्त्री लक्ष्मीनारायणदास सह संत, महंतांचे यावळी भक्तगणांना मार्गदर्शन लाभले. यावेळी 3 ते 4 हजार भाविक यावेळी उपस्थित होते.

50 लाखाच्या निधीतून तिर्थक्षेत्र विकासाला मिळाली गती
यावल तालुक्यातील बामणोद येथून अवघ्या 4 किलोमिटर एका भव्य टेकडीवरती हनुमंतरायासह गणपती, महादेव मंदिर, श्री कालभैरव मंदिर, श्री स्वामी नारायण मंदिर असून या सर्व मंदिरांची देखभाल ही स्वामी जगत्प्रकाशदास महाराज करीत असतात.आमदार हरिभाऊ जावळे, आमदार सुरेश भोळे यांच्या निधी व सहकार्यातून व माजी नगराध्यक्ष निलेश राणे यांच्या प्रयत्नातून जवळपास 50 लाख रुपयांची विविध विकासकामे या तीर्थस्थळावर करण्यात आली. यात हायमस्ट लॅम्प, रस्ते खडीकरण, काँक्रिटीकरण, चार लहान पुल, वृक्ष लागवड, मंदिर परिसराला लागून मोरनदी व धाडीनदी यांच्या संगम असल्याने मोठ्या प्रमाणात नालाखोलीकरणाची कामे याठिकाणी युध्द पातळीवर सुरु आहे. आज रोजी विविध मान्यवरांनी याठिकाणी उपस्थिती दिली. यात मसाकाचे चेअरमन शरद महाजन, संचालक नरेंद्र नारखेडे, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, एपीआय सार्थक नेहेते, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती नारायण चौधरी, माजी पंचायत समिती उपसभापती लिलाधर चौधरी, जयंत चौधरी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, राष्ट्रवादी माजी शहराध्यक्ष पप्पू चौधरींसह विविध विभागांची अधिकारी मंडळी यावेळी उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रम यशस्वीतेसाठी बबलू महाजन, नितीन भोगे, अमोल बासे, भुषण पाटील, प्रशांत नारखेडे, महेंद्र पाटील, मनोज फेगडे, राकेश पाटील आदींनी परिश्रम घेतले.

यावल येथे मोठा मारुती मंदिरात महापूजा
हनुमान जयंती निमित्त शहरातील मोठा मारुती मंदिरात सकाळी 6 वाजेला महापूजेसह महाप्रसादाचे वाटप करण्यात आलेे. नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांच्या हस्ते शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करण्यात आली. यानंतर 11.30 वाजेपासून महाप्रसाद वाटपास सुरुवात करण्यात आली. शहरासह परिसरातील भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.