‘श्री’च्या स्वागतासाठी सजली बाजारपेठ

0

नवापूर । गणपती बाप्पाचा आगमनाची आतुरता सर्वानाच लागली असुन ’श्री’ची सजावट करण्यासाठी बाजार पेठेत विविध वस्तु विक्रीसाठी आल्या आहेत. गणेश भक्त त्या खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहे.

आपल्या घरात श्रीची स्थापना करुन आकर्षक डेकोरेशनसाठी थर्माकोलने बनवलेले विविध वस्तु जसे आसन,मोदक,झालर,चक्र,कंदिल,लाईटिंग आदि गणेश भक्त खरेदी करतांना दिसत आहे. दरम्यान गणेश मुर्ती व डेकोऱेशनचे साहित्य विक्रीतुन बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे.