काका वेणुगोपाल यांचा धक्कादायक खुलासा
मुंबई : श्रीदेवींचे काका वेणुगोपाल रेड्डी यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रेड्डी यांनी म्हटले आहे की, श्रीदेवी ही मागील काही महिन्यांपासून प्रचंड दु:खी होती. ती तणावात वावरत होती. ती जगासाठी चेहर्यावर हास्य दाखवत होती. परंतु आतून प्रंचड दु:खी होती. तिची आर्थिक स्थिती योग्य नव्हती.
श्रीदेवींच्या अनेक मालमत्ता विकल्या
श्रीदेवींच्या आयुष्यात खूप दुःख होते. त्या फक्त मुलींसाठी चेहर्यावर हास्य दाखवत होत्या. पती बोनी कपूर यांचे सिनेमे पडल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले होते. नुकसान भरुन काढण्यासाठी त्यांनी श्रीदेवींच्या अनेक मालमत्ता विकल्या होत्या. त्यामुळे श्रीदेवीची आर्थिकस्थिती चांगली नव्हती. त्यामुळे त्या खूप अस्वस्थही होत्या, असे रेड्डी यांनी सांगितले. श्रीदेवी यांनी पुन्हा सिनेमात काम करावे, असे बोनी कपूर यांनी तिला सांगितले होते. कुटुंबांचा सांभाळ आणि आर्थिक परिस्थिती लक्षात घेता, तिने बॉलिवूडमध्ये पुन्हा काम सुरु केले होते, असेही रेड्डी यांनी सांगितले. अभिनेत्री श्रीदेवी यांचे 24 फेब्रुवारीला दुबईत निधन झाले होते. दरम्यान, रविवारी चेन्नईमधील क्राऊन प्लाझामध्ये श्रीदेवींसाठी प्रार्थनासभेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी त्यांच्या दोन्ही मुली खुशी आणि जान्हवी चेन्नईला रवाना झाल्या. प्रार्थना सभेला बॉलिवूडसह तामिळ फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक सेलिब्रिटीज उपस्थित होते.