मुंबई : एका रात्रीतच व्हायरल झालेली मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारिअर पुन्हा एकदा चर्चेत आहे. प्रिया आता बॉलीवूडमध्ये एन्ट्री करत आहे. ‘श्रीदेवी बंगलो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला आहे.
प्रिया प्रकाशच्या श्रीदेवी बंगलोचा टिजर पाहताच कळते की, हा सिनेमा अभिनेत्री श्रीदेवी आणि ज्या दुर्घटनेत तिचा मृत्यू झाला, यावर आधारित आहे. धक्कादायक रित्या श्रीदेवींचा मृत्यू झाला होता. या घटनेने श्रीदेवीच्या देश-विदेशातील चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.