मुंबई : व्हायरल गर्ल प्रिया प्रकाशचा पहिलाच बॉलिवूड चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ‘श्रीदेवी बंगलो’ या चित्रपटातून प्रिया बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत आहे. अलिकडेच या चित्रपटाचा टीजर रिलीज झाला. मात्र, या टीजरवर चाहत्यांच्या नकारात्मक प्रतिक्रीया पाहायला मिळत आहेत. आता श्रीदेवींचे पती बोनी कपूर यांनीही या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत माम्बुली यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
‘श्रीदेवी बंगलो’ चित्रपटात प्रिया एका अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसत आहे. टीजरच्या शेवटी या अभिनेत्रीचा मृत्यू बाथटबमध्ये झालेला दिसतोय. त्यामुळे हा चित्रपट श्रीदेवींच्या आयुष्याशी संबधीत असल्याचा अंदाज चाहत्यांनी लावला आहे. सोशल मीडियावर या टीजरवर नकारात्मक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.