श्रीनगर परिसरात विज तारांनी घेतला पेट

0

भुसावळ। जळगाव रोडवरील श्रीनगर येथे वार्‍याचा वेग जास्त असल्या कारणाने शनिवार 27 रोजी दुपारी साधारण 12 वाजेच्या सुमारास एकाच खांबावर असलेल्या 11 केव्ही तसेच एलटी लाइनवर झाडाची फांदी तुटली व 11 केव्ही लाइनमध्ये अडकली. क्षणातच तिने पेट घेतला व स्पार्किंग सुरु झाले. शेजारीच असलेल्या डीपीवर सुद्धा स्पार्किंग झाले व 11 केव्ही लाइन तुटुन जमिनीवर पडली. त्यात विज पुरवठा सुरु होता. मात्र रहिवाशांच्या लक्षात हि बाब आल्याने त्यांनी लागलीच याची सुचना विज वितरण कर्मचार्‍यांना दिल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

डिपीवरील वाढता भार कमी करा
विज तारा खाली पडल्याचे लक्षात येता यातील विज पुरवठा सुरुच होता अशी आशंका नागरिकांना होती म्हणून प्रा.धिरज पाटील, पवन लोखंडे, नितिन पाटील, रामचंद्र पाटील, कृष्णा सोनवने, शुभम कोळी व इतर नागरिकांनी येथून ये- जा करणार्‍या नागरिकांना सतर्क केले. तसेच विज वितरण कंपनीला कळवले. या भागात विज पुरवठा वारंवार खंडीत होत असल्यामुळे मागील दोन- तीन दिवसांपासून नागरिक त्रस्त आहेत. डिपीवरील समस्या निवारण केली गेली पाहिजे असे प्रा.धिरज पाटील यांनी अभियंता व्ही.डी.नवघरे यांच्याशी चर्चा करून विनंती केली आहे.