श्रीनारायण भक्तीपंथ बनेल सनातन धर्माची ओळख

0

जळगाव । येथिल सागर पार्क मैदानावर श्रीनारायण भक्ती पंथ, जळगाव येथिल भक्त गणांनी 21 ते 25 जानेवारी पर्यंत श्रीनारायण सर्वकल्याण पूजा व भक्ती उपासना शिबिराचे आयोजन केलेले आहे. श्रीनारायण भक्ती पंथ अवघ्या विश्वात सनातन धर्माची ओळख बनेल असे प्रतिपादन प्रवर्तक ब्रह्मस्वरुप संतश्री लोकेशानंदजी महाराज यांनी केले. या प्रसंगी विशेष सरकारी वकील अ‍ॅड.उज्वल निकम यांचा आ.राजुमामा भोळे यांच्या उपस्थितीत संतश्री लोकेशानंदजी महाराजांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.

ज्ञान, धनसंपदा, सुख कधीच कमी होणार नाही
सृष्टीच्यानिर्मिती पासुन सनातन धर्मीय ईश्वरवादी होते व साक्षात परमेश्वर “श्रीनारायणांच्या” भक्तीला प्राधान्य होते. कारण जन्म-मृत्यू चक्र पलिकडे, सदैव अमर, अविनाशी परमेश्वर श्रीनारायण (शेषशायी नारायण) हेच आहेत.जे सतत श्रीनारायणची भक्ती करतात त्यांचे ज्ञान, धनसंपदा, सुख कधीच कमी होणार नाही त्यांचा आत्मविश्वास अतिशय प्रबळ राहील. श्रीनारायणांच्या फक्त दर्शनाने दुख व पापांचा नाश होतो. संतश्री लोकेशानंदजी महाराज यांनी अतिशय अल्प वयात पुर्ण ब्रम्हनिष्ठा होऊन श्रीनारायण भक्ती पंथाच्या रुपाने एक विशाल भक्ती आंदोलनाची सुरुवात केली. त्यांनी “श्रीमद्श्रीनारायणम्” हा श्रीनारायण भक्तीने परिपुर्ण ग्रंथही लिहीला असुन संपुर्ण जगात सुख शांती नांदावी यासाठी परमेश्वर भक्ती हा एकमेव उपाय आहे असे ते सांगतात. शहरातील भाविकांनी 25 जानेवारी पर्यंत चालणार्‍या या भक्ती उपासन शिबीरास स.7.30 ते 10.30 व दु.3.30 ते 7.30 उपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आयोजकांनी कळविले आहे.