वकील संघाचे प्रांताधिकार्यांना निवेदन
भुसावळ- अहमदनगरचे माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक उद्गार काढल्याने या बाबीचा निषेध म्हणून भुसावळ तालुका वकील संघाने प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना मंगळवारी निवेदन देत कठोर कारवाईची मागणी केली. छत्रपतींबद्दल प्रत्येक माणसास आदर असून छिंदम यांनी काढलेले उद्गार चीड आणणारे असून वकील संघ या उद्गाराचा निषेध करीत असल्याचे निवेदन नमूद आहे. याप्रसंगी वकील संघाचे अध्यक्ष अॅड.अशोक शिरसाठ यांच्यासह वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.