पिंपरी-चिंचवड : विश्वशांती सेवा समिती पुणे विभागाच्या वतीने 24 ते 31 डिसेंबर या कालावधीत दुपारी 2:30 ते सायंकाळी 6:30 यावेळेत श्रीमद भागवत कथेचे आयोजन केले आहे. निगडी प्राधिकरणातील भेळ चौकाजवळ मैदानावर देवकीनंदन ठाकूर महाराज निरूपण देणार आहेत. माहिती समितीचे प्रमुख जगदीशप्रसाद सिंघल यांनी ही माहिती दिली.
दररोज दुपारी अडीचला निरुपण
24 डिसेंबरला सकाळी नऊला निगडी-प्राधिकरण परिसरातून कलश यात्रा निघेल. दुपारी अडीच वाजता ठाकूर महाराज व्यास नारद संवाद- कुंती स्तुती या विषयावर निरूपण देतील. 25ला कपिल देवहुती संवाद- सती चरित्र, धृव चरित्र, 26 ला जडभरत संवाद- नृसिंह अवतार, वामन अवतार, 27ला श्रीराम व श्रीकृष्ण जन्मोत्सव, 28 ला भगवान श्रीकृष्ण बाललीला, 29 ला रुख्मिणी विवाह, 30 ला द्वारकालीला व सुदामा चरित्र होईल. 31 डिसेंबरला सायंकाळी 7 ते रात्री 9 यावेळेत महाप्रसाद, तर 10 ते 1 वा. भजन कार्यक्रनाने या महोत्सवाची सांगता होईल.