श्रीमन महासाधू श्रीमोरया गोसावी यांच्या समाधी मंदिरावर पुष्पवृष्टी

0

पिंपरी चिंचवड : श्रीमन महासाधू श्रीमोरया गोसावी यांचा 456 वा संजीवन समाधी महोत्सव उत्साहात पार पडला. यानिमित्त श्रीमोरया गोसावी समाधी मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. शुक्रवारी पहाटे साडेचार वाजता चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज व चिंचवड ब्रह्मवृंद यांच्या हस्ते श्रीमोरया गोसावी समाधीची महापूजा व अभिषेक करण्यात आला.

सकाळी सात वाजता श्रीमोरया गोसावी यांची दिंडी श्रीमोरया गोसावी समाधी मंदिर परिसरात काढण्यात आली. त्यानंतर समाधी मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. पिंपरी चिंचवड व शहरातील हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. रात्री श्रीमोरया गोसावी समाधी समोर धुपारती करण्यात येणार आहे.