जळगाव : एमआयडीसी परीसरातील श्रीराम पॉलिमर्स या कंपनीत 13 हजार 600 रुपये किंमतीच्या विविध साहित्यांची चोरी करणार्या सराईत चोरट्याला पोलिसांनी एमआयडीसी मंगळवार, 8 फेब्रुवारी रोजी अटक केली. उमेश उर्फ साई सोनाजी आटे (रा.सुप्रिम कॉलनी, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
चोरी प्रकरणी दाखल होता गुन्हा
निकीता राजेंद्र महाजन (19, रा.मेहरूण, जळगाव) यांची एमआयडीसीच्या व्ही.सेक्टरमधील श्रीराम पॉलिमर्स नावाची चटई तयार करण्याकामी लागणार्या दाण्याची कंपनी आहे. 17 जानेवारी रोजी निकीता आणि त्यांची आई यांनी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास कंपनीतील काम बंद करीत घर गाठलेे. या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी कूलूप तोडून कंपनीतून पाण्याची मोटर, शिलाई मशीन, दाणा मशिनचे दोन कटर, 100 मीटर वायर, दाणा मशिनला आवश्यक असणार्या तिन पुली असा एकुण 13 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी नेल्याचे 20 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता उघडकीला आले होते. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गोपनीय माहितीवरून कारवाई
एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, मिलींद सोनवणे, विकास सातदिवे, हेमंत कळसकर, सुधीर साळवे, योगेश बारी यांनी मंगळवार, 8 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजता आरोपीला अटक केली. संशयीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्यावर यापुर्वी वेगवेगळे सात गुन्हा दाखल असल्याचे सूत्रांनी सांगितले. तपास पोलिस नाईक विकास सातदिवे करीत आहे.