कोलंबो । श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुना रणतुंगाने संघाच्या सततच्या पराभवांसाठी श्रीलंका क्रिकेटच्या प्रमुखांना दोषी ठरवत, त्यांची चौकशी करण्याची मागणी आयसीसीकडे केली आहे. रणतुंगा म्हणाले की, श्रीलंकेच्या राष्ट्रीय संघात शिस्त नसल्यामुळे त्यांना सतत पराभव स्वीकारावे लागत आहेत. या मागणीमुळे रणतुंगा श्रीलंका क्रिकेटची सुत्रे हाती घेण्यास उत्सुक असल्याचे बोलले जात आहे. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेला 304 धावांनी पराभव पत्करायला लागला होता, तर दुसर्या सामन्यात त्यांच्यावर एक डाव आणि 53 धावांनी पराभूत होण्याची नामुष्की ओढावली होती. तिसर्या सामन्यात व्हाईटवॉश टाळण्यासाठी श्रीलंकेला प्रयत्न करावे लागणार आहेत. इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही श्रीलंकेचे आव्हान लगेच संपुष्टात आले होते.
सुमीतपाला यांनी आरोप फेटाळला
अर्जुना रणतुंगा यांनी श्रीलंका क्रिकेटचे अध्यक्श तिलंगा सुमीतपाला यांच्यावर सट्टेबाजी केल्याचा आरोप केला होता. सुमीतपाला यांनी रणतुंगा यांचा हा आरोप लगेचच फेटाळून लावला होता.
रणतुंगा म्हणाले की, संघात काहीच शिस्त राहिलेली नाही. सर्वप्रकारच्या सट्टेबाजीत खेळाडूही सहभागी असल्यामुळे क्रिकेटपटूंना दोष देण्यात अर्थ नाही. सर्वात प्रथम संघटनेतील अधिकार्यांना ताळ्यावर आणावे लागेल.
क्रिकेटपटूंना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला गेला
श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंना कथित मॅचफिक्सिंग प्रकरणात सहभागी करण्याचा प्रयत्न करण्यात आले असल्याचा अहवाल आला आहे.
रणतुंगा म्हणाले की, आयसीसीने सुमीतपाला यांचे सट्टेबाजांशी असलेले संबंध आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या कारभाराची आयसीसीने चौकशी करावी. सुमितपाला यांनी अर्जुना रणतुंगा यांनी केलेल्या आरोपांचे खंडन केले आहे. सुमीतपाला म्हणाले की माझा कधीही कुठल्याही सट्टेबाजाशी संबध आलेला नाही.