श्रीलंकेत भारत खेळणार टि-20 मालिका

0

नवी दिल्ली । 2018 मध्ये भारत,बांगलादेश व श्रीलंका याच्या देशाच्या संघामध्ये त्रिकोणीय टि-20 मालिका होणार आहे.मालिका श्रीलंकेत खेळली जाणार आहे.श्रीलंका क्रिकेटने यांची नुकतीच घोषणा केली. श्रीलंकेचा संघ पुढील वर्षी भारतात 3 कसोटी, 5 वन-डे आणि 2 टी-20 सामने खेळणार होता.

यामध्ये बदल करण्यात आला असून काही वन-डे सामन्यांच्या जागी टी-20 सामने खेळवले जातील .श्रीलंका आणि बांगलादेश क्रिकेट मंडळाला आर्थिक लाभ व्हावा या उद्देशाने हा बदल करण्यात आला आहे.आयसीसीच्या बैठकांमध्ये श्रीलंका नेहमी भारताचे समर्थन करते आता बांगलादेश मंडळही भारताच्या बाजुने आले आहे.’निदाहास ट्रॉफी’ असे या मालिकेचे नाव असणार आहे. या मालिकेसाठी श्रीलंकेच्या भारत दौ-यातील किती सामने रद्द केले आहेत याबाबत अजून माहिती देण्यात आलेली नाही.