मुंबई : बिग बॉस १२’ च्या फिनालेचा रनरअप श्रीशांत आता ‘कॅबरे’ चित्रपटात झळकणार आहे. यामुळे श्रीशांत ठिकठिकाणी चित्रपटाला प्रमोट करताना दिसून येत आहे. श्रीशांतने हॉलिवूड दिग्दर्शक स्टीवन स्पीलबर्गसोबत काम करण्याची इच्छाही व्यक्त केली.
हॉलिवूड चित्रपटात लहानशी भूमिका असो की मोठी. पण मला स्टीवन स्पीलबर्ग यांच्यासोबत काम करायचे आहे. हा माझ्या आयुष्याचा अनुभव असेल. एखाद स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटेल आणि आयुष्यात काहीही होऊ शकते यावर मला पूर्ण विश्वास आहे, असे श्रीशांत म्हणला.