चिंबळी : दरवर्षी प्रमाणे चिंबळी (ता.खेड) येथे श्री.काळभैरवनाथ महाराजांचा उत्सव गुरुवारी (दि.5) व शुक्रवारी(दि.6) आयोजित करण्यात येणार असल्याचे यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या वतिने सांगण्यात आले आहे. उत्सवानिमित्त मदिरांला विद्युत रोषणाई करून मंडप उभारण्यात आला आहे. गुरूवारी पहाटे श्रींची आरती,महापुजा,अभिषेक, व सकाळी देवाच्या मानाचे माडंव टहाळे मिरवूनक तसेच सायंकाळी आरती व ढोल तासाच्या भव्य गजरात छबीना मिरवणूक व करमणुकीसाठी चंद्रकात ढवळपुरीकर यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम व भैरवनाथ महाराजाच्या सभामंडपात संगीत भजनाचा हरिजागर होणार आहे.
तर शुक्रवारी सकाळी लोकनाट्याचा कार्यक्रम व दुपारी निकाली कुस्ताचा जंगी आखाडा आयोजित करण्यात आला आहे. या कुस्ती आखाड्याचे उद्घाटन पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, शिरूर लोकसभेचे खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील आदि मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी आ. सुरेश गोरे माजी आ. दिलीप मोहिते, आ. महेश लाडंगे,महापौर नितीन काळजे, खेड बाजार समितीचे माजी सभापती विलास कातोरे, संचालक पाडूरंग बनकर, सरपंच रेश्मा सोनवणे व सर्व सदस्य तसेच यात्रा कमिटीचे अध्यक्ष उपअध्यक्ष सर्व संचालक व समस्त ग्रामस्थाच्य उपस्थित राहणार आहेत.