श्री क्षेत्र कोथळीत अ‍ॅम्युझमेंट पार्कचे पर्यटनमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

0

मुक्ताईनगर- प्रादेशिक पर्यटन विकास निधी अंतर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत श्री क्षेत्र कोथळी येथे 50 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार्‍या अ‍ॅम्युझमेंट पार्कचे भूमिपुजन राज्याचे पर्यटन व रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते सोमवारी दुपारी झाले. याप्रसंगी श्री विठ्ठल मंदिरा मागे एक कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या सभागृहाचे उद्घाटन सामाजिक व न्याय मंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
या कार्यक्रमास माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे, मध्यप्रदेशच्या महिला व बालविकास मंत्री अर्चना चिटणीस, खासदार रक्षा खडसे, आमदार हरीभाऊ जावळे, आमदार संजय सावकारे, माजी आमदार गुरूमुख जगवाणी, जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष नंदू महाजन, भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे, मुक्ताईनगरच्या नगराध्यक्ष नजमा तडवी, पंचायत समिती सभापती शुभांगी भोलाणे, जिल्हा परीषद सदस्य वैशाली तायडे, निलेश पाटील, जयपाल बोदडे, वनिता गवडे, जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, निवृत्ती पाटील, स्वीय सहाय्यक योगेश कोलते, संदीप देशमुख या प्रमुख पदाधिकार्‍यांसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, पर्यटन महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक नितीनकुमार मुंडावरे, उपअभियंता महेश बागुल, अभियंता आय.बी.शेख, जितेंद्र नेहते, एल.सी.सावखेडकर, वंडर कन्स्ट्रक्शनचे जावेद अन्वर, निलेश कोलते हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन पत्रकार व शिक्षक विनायक वाडेकर यांनी करून आभारही मानले. याप्रसंगी नाथ मठ अंतर्गत स्व.निखील एकनाथराव खडसे वारकरी शाळेच्या विद्यार्थ्यांना ब्लँकेटचे वाटपदेखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

पर्यटन विभागामार्फत अ‍ॅम्युझमेंट पार्क
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नातून कोथळी परीसराच्या विकासासाठी 100 कोटी रुपयांच्या विकास आरखड्यास मंजुरी मिळाली आहे. याकरीता ग्रामविकास विकास विभागाने 25 कोटी रूपये मंजूर केले असून नऊ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून या ठिकाणी विविध विकासकामे करण्यात आली आहे. तर अनेक कामे सुरू आहेत तसेच पर्यटन विभागानेही पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून याठिकाणी पर्यटन विभागामार्फत अ‍ॅम्युझमेंट पार्क बांधण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ मंत्री रावल यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचबरोबर संत मुक्ताईनगर मंदिर परीसरात बांधण्यात आलेल्या सभा मंडपाच्या कोनशिलेचे अनावरण करून मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.