यावल- सातपुड्यातील श्री क्षेत्र मनुदेवी येथुन दुचाकीची चोरीस गेल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना 23 जुलै रोजी दुपारी घडली. या प्रकरणी शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी वैभव माणिकराव दांडगे (रा.चांगदेव, ता.मुक्ताईनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते मनुदेवी येथे दर्शनासाठी दुचाकी (क्रमांक एम. एच. 19 सी. एल. 6535) ने आल्यानंतर चोरट्यांनी संधी साधत दुचाकी लांबवली. तपास हवालदार संजय तायडे करीत आहेत.