श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालयात मुरुड तालुका बुद्धिबळ स्पर्धा संपन्न

0

नांदगाव। रायगड जिल्हा क्रीडा विभागातर्फे तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन श्री छत्रपती शिवाजी नूतन विदयालय यशवंतनगर नांदगाव येथे करण्यात आले होते. विविध शाळेतील 90 पेक्षा जास्त विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. ही बुद्धिबळ स्पर्धा 14,17 व 19 अशा तीन वयोगटात घेण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन सहजीवन विद्या मंडळाचे अध्यक्ष व पंचक्रोशीचे अध्यक्ष फैरोज घलटे यांच्या शुभ हस्ते फित कापून करण्यात आले.यावेळी या विद्यालयाचे मुख्याध्यापक गिरीश जोशी, पर्यवेक्षक उत्तमराव वाघमोडे, दत्तात्रेय खुळपे, तालुका  क्रीडा विभागाचे प्रमुख पांडुरंग आरेकर आदी मान्यवर व सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्याना बुद्धिबळ खेळाविषयी माहिती देताना बुद्धिबळ स्पर्धेत फिडे मानांकन मिळवणारे व शाळेचे मुख्याध्यापक गिरीश जोशी आपल्या भाषणात म्हणाले कि, बुद्धिबळ स्पर्धेमुळे मुलांच्या बुद्धिमतेत निश्चितच वाढ होत असून या खेळामुळे समरणशक्ती वाढणार असल्याने अभ्यासात सुद्धा प्रगती होणार आहे. बुद्धिबळ हा खेळ शांतपणे खेळण्याचां असून चाली सुद्धा योग्य पद्धतीने खेळणे आवश्यक असते. समोरच्या प्रतिस्पर्ध्याचे मन ओळखण्याची ताकद या खेळामुळे प्राप्त होत असते व तो पुढची चाल काय करणार आहे याचे ज्ञान प्राप्त झाल्याने या खेळात प्राविण्य मिळवता येऊ शकते.

यावेळी 14 वर्षीय मुलींमधून प्रथम क्रमांक अमुल्या प्रवीण भगत ( नचिकेताज हायस्कूल), द्वितीय क्रमांक आस्था सुर्वे, तृतीय क्रमांक आनम खान यांनी मिळवला आहे. तर याच गटामधील मुलांमधून श्रयश भोर प्रथम, द्वितीय यश रोटकर तृतीय विशम संजय पोतदार ( सुविद्या विद्यालय ) यांनी मिळवला आहे.

17 वर्षीय मुलींमधून आमन इंद्रूस प्रथम श्रुतिका पाटील द्वितीय सलोनी मेस्त्री तृतीय क्रमांक मिळवला तर याच गटातील मुलांमधून अपूर्व पाटील प्रथम ( जिंदाल हायस्कूल साळाव ), निखिल पाटील द्वितीय ( नचिकेताज हायस्कूल) जतीन बन्सल तुरतीय क्रमांक मिळाला आहे.

19 वर्षीय मुलींमधून प्रथम क्रमांक उपासना प्रमोद पुलेकर ( नाझ अकॅडमि जुनिअर कॉलेज ) समिन शहाबंदर द्वितीय (मेहबूब एजुकेशन हायस्कूल) पूजा बोरांना तुरतीय (नाझ अकॅडमी जुनिअर कॉलेज) तर याच गटामधील मुलांमधून यश पाटील प्रथम (नांदगाव हायस्कूल) तरुण शर्मा द्वितीय (जिंदाल हायस्कूल साळाव ) सन्नी कंटक तृतीय (नांदगाव हायस्कूल) याना मिळाला आहे.हे सर्व यशस्वी विद्यार्थी जिल्ह्यात होणार्‍या स्पर्धेसाठी पात्र झाले असून तिथे सुद्धा बुद्धिबळ खेळाची चमक दाखवणार आहेत.