चिंचवड : श्री जैन विद्या प्रसारक मंडळाच्या श्री प्राथमिक जैन विद्यामंदिरात व शिशुविहार विभागाचा स्नेहसंमेलन उत्साहात पारी पडले. या कौतुक सोहळ्यास श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे कार्यकारीणी सदस्य आनंदराम धोका, मंडळाचे जनरल सेक्रेटरी अॅड. राजेंद्रकुमार मुथा, सहाय्यक सेक्रेटरी अनिल कांकरीया, आर.टी.ओ. इन्स्पेक्टर चंद्रकांत माने, वैशाली बाफना व दीपक बाफना उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कला सादर केल्या. नृत्ये, नाटक, गीते सादर केली. कार्यक्रमाचे विशेष म्हणजे शालेय मंत्रिमंडळाने वार्षिक अहवाल किर्तनाच्या रुपात सादर केला. कार्यक्रमाचे पाहुण्यांचा परिचय एस.डी.मुसळे यांनी करून दिला. प्रास्तविक मु÷ख्याध्यापिका शि. रा. कुलकर्णी यांनी केले.