श्री विसर्जन मिरवणुकीत पोलिसांची मनमानी; निषेध

0

भुसावळ । नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवातील श्री विसर्जन मिरवणुकीत सार्वजनिक मंडळाच्या पदाधिकार्‍यांवर पोलिसांनी बळाचा वापर करत मारहाण करून गुलाल उधळू देण्यास मज्जाव केल्याचा आरोप शहरातील अनेक गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांनी केला आहे. या संदर्भात प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. हिंदुंच्या धार्मिक परंपरेचा भाग असलेल्या उत्सवात पोलिसांनी दिलेल्या अमानुष वागणुकीचा निषेध करण्यात आला व भविष्यात अशा पध्दतीने पोलिसांकडून वागणूक मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी भुषण महाजन, प्रशांतसिंग ठाकूर, रितेश जैन, देवेंद्र पाटील, मयुर व्यवहारे, मनोज चौधरी, शुभम पचेरवाल, चेतन बोरोले, राजेश जैन, वैभव भागवत, भुषण कुळकर्णी, ऋषी अवतारे आदींनी केली आहे.