शेलपिंपळगाव : पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. या मध्ये महात्मा फुले गुणवत्ता वाढ व विकास मार्गदर्शन अभियान या स्पर्ध्येत 500 विद्यार्थी संख्येपर्यंतच्या गटात श्री शरदचंद्र विद्यालय, वडगाव घेनंद पुणे जिल्हयात प्रथम क्रमांक आल्याबद्दल सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात आले. श्री माऊली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रमेश पवार, संपतराव घेनंद(सचिव),मुख्याध्यापक,अंकुश सांडभोर, कैलास घेनंद, विक्रम लाड, विलास नितनवरे यांनी पारितोषिकाचा स्विकार केला.
या अभियाना अंतर्गत पुणे जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांची तपासणी पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ आणि पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या वतीने करण्यात आली. तपासणीमध्ये शाळांमधील भौतिक सुविधा, प्रशासकीय कामकाज, अध्ययन व अध्यापन प्रक्रिया, अभ्यासपुरक आणि अभ्यासोत्तर उपक्रम,संगणक विभाग या बाबींची तपासणी करण्यात आली. विद्यालयाचा पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक आल्याबद्दल श्री. माऊली शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी,वडगांव घेनंद च्या विद्यमान सरपंच ललिताताई नितनवरे,उपसरपंच मारुती बवले, हृषिकेश पवार, बबनराव घेनंद पाटिल,पांडुरंग बवले,प्राचार्य डॉ. कैलास बवले,अॅड. श्याम बवले यांनी शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.