संकल्पपत्रात भाजपचे मोठे आश्वासन; सत्तेत आल्यास जम्मू-काश्मीरमधील ३५-अ रद्द करणार

0

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आज जाहीरनामा जाहीर केला. संकल्पपत्र या नावाने भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. संकल्प पत्रामध्ये शेतकरी, राम मंदिर, तिहेरी तलाक या मुद्द्यांवर भर दिला आहे. राष्ट्रीय सुरक्षा नितीवर भर दिला आहे. जम्मू आणि काश्मीर ला विशेष दर्जा देणाऱ्या संविधानातील कलम 35 A बद्दल भाजपाच्या संकल्प पत्रात मोठी घोषणा केली आहे. पुन्हा सत्तेत आल्यास जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे 35 A कलम रद्द करणार असल्याचे भाजपातर्फे जाहीर करण्यात आले आहे.

आम्ही कलम 35A संपवण्यासाठी कटीबद्ध आहोत. जम्मू आणि काश्मीरला लागू होणारे 35 A कलम हे स्थानिक नसलेल्या तसेच महिलांवर भेदभाव करणारे आहे. हे कलम म्हणजे जम्मू आणि काश्मीरच्या विकासात बाधा आहे. राज्यातील सर्व नागरिकांना सुरक्षित आणि शांतीपूर्ण वातावरण देण्यासाठी आम्ही सर्व पाऊले उचलू असेही भाजपाच्या संकल्प पत्रात म्हटले आहे. आम्ही काश्मीरी पंडीतांच्या सुरक्षिततेसाठीही प्रयत्न करणार असल्याचेही यात म्हटले आहे.